तब्बल सव्वालाख स्क्वेअर फुटाची साकारणार 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी
    
  सांगली - येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल सव्वालाख स्क्वेवर फुटाची 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०० कलाशिक्षक मिळून शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी ही महारांगोळी साकारणार आहेत. लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम उपक्रम साकारला जाणार आहे.


तब्बल सव्वालाख स्क्वेअर फुटाची साकारणार 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी सांगली - येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल सव्वालाख स्क्वेवर फुटाची 'शिवराज्याभिषेक' विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १०० कलाशिक्षक मिळून शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी ही महारांगोळी साकारणार आहेत. लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम उपक्रम साकारला जाणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने भव्य दिव्य शिवराज्याभिषक महारांगोळी साकारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे १०० कलाशिक्षक मिळून १४ फेब्रुवारीपासून हा विश्वविक्रम साकारण्यासाठी सुरुवात करणार आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये हा विश्वविक्रमी शिवराज्याभिषक महारांगोळी साकारण्यात येणार आहे. २५० बाय ५५० फूट या महारांगोळीसाठी तब्बल ३० टन रांगोळी आणि ५ टन विविध रंग वापरण्यात येणार आहेत.

या महारांगोळीची गिनीज बुक, एशिया बुक, लिम्का बुक इंडिया बुक अशा विविध ९ वर्ल्ड बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या महारांगोळीसाठी ३० लाख रुपये खर्च होणार असून लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम उपक्रम होणार आहे. यासाठी प्रसिध्द रोंगोळीकार आदमअली मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज्याभिषेक विश्व विक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. ६ दिवस ही महारांगोळी काढण्यासाठी लागणार असून १९ फेब्रुवारी रोजी याचे उद्घाटन होऊन भव्यदिव्य कलाकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments