छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी रांगोळी सांगली येथे शिवाजी स्टेडियम मध्ये साकारण्यात आलेली आहे. सांगलीतील शंभर रंगावलीकार, शिक्षक यांनी मिळून तब्बल शंभर तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केलेली आहे. या रांगोळीसाठी 30 टन हून अधिक रांगोळी,पाच टन कलर तर 30 लाखाहून अधिक खर्च या रांगोळीसाठी आलेला आहे. आलेला आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत कधीच न घडलेली विश्व रेकॉर्ड रांगोळीच्या माध्यमातून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये साकारत आहे. *गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारख्या नऊ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या रांगोळीची एकाच वेळी नोंद होणार आहे*.19 फेब्रुवारी 2019 रोजी या विश्वविक्रमी रांगोळीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तरी *सांगली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून सर्व शिवभक्तांनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य अशा रांगोळीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहावे*....
Comments
Post a Comment